Posts

श्री स्वामी समर्थ

Image
माघ वद्य १, शके १३८०, इ.स. १४५८ मध्ये  नृसिंह सरस्वती  श्री शैल्य यात्रेच्या निमित्ताने कर्दली वनात गुप्त झाले. याच वनात तीनशे वर्षे ते प्रगाढ समाधी अवस्थेत होते. या काळात त्यांच्या दिव्य शरीराभोवती मुंग्यांनी प्रचंड वारूळ निर्माण केले. या जंगलात एका लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव त्या वारूळावर चुकून बसला व श्री स्वामी वारुळातून बाहेर आले. तेथून ते प्रथम काशीस प्रगट झाले. पुढे कलकत्ता येथे जाऊन त्यांनी कालीमातेचे दर्शन घेतले. नंतर गंगा तटाकाने अनेक ठिकाणी भ्रमंती करून गोदावरी तटाकी आले. तेथून हैद्राबादवरून मंगळवेढ्यास बारा वर्षे राहिले. आणि मग  पंढरपूर , मोहोळ, सोलापूरमार्गे  अक्कलकोट  येथे आले. त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य अखेरपर्यंत म्हणजे शके १८०० पर्यंत होते. दत्त  संप्रदायात  श्रीपाद श्रीवल्लभ  आणि नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेयांचे पहिले व दुसरे अवतार म्हणून समजले जात. श्री स्वामी समर्थ हे नृसिंह सरस्वतीच होत. म्हणजे दत्तावतार होय. अक्कलकोटचे परब्रह्मश्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना अभयदान देताना म्हणत, ”भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.” आजही त्याची प्रचीती भक्तांना